पिग्मी/ दैनंदिन ठेव योजना
समृद्ध भारतीय नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये दैनिक खाते सुरू करा व उत्तम व्याजदर मिळवा तसेच भविष्यातील व्यवसायात येणाऱ्या अडचणी तसेच भांडवल याची आर्थिक तरतूद करून ठेवा तसेच आजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. म्हणूनच स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी. याच विचारातून आम्ही एक तरतूद केली आहे. रोजंदारीवर काम करणारे कामगार, लहानसहान व्यापारी आणि शेतकऱ्यांना बचतीची सवय लागावी तसेच त्यांच्या लग्न, घर खरेदी, वाहन खरेदी अशा मोठ्या भांडवली गरजा वेळीच भागवण्यासाठी मोठी रक्कम साठवली जावी म्हणून समृद्ध भारतीय नागरी सहकारी पतसंस्थेने पिग्मी अर्थात दैनंदिन ठेव योजना सुरू केली. या योजनेत रोजच्यारोज अगदी कमीत कमी रक्कम गुंतवून उद्या एकत्रितपणे एका मोठ्या रकमेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
छोट्या छोट्या बचतीतून पूर्ण करा स्वप्नांचा महासागर! पिग्मी / दैनंदिन ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
Account Enquiry


