बचत खाते
दिवस रात्र एक करून, काबाडकष्टाने एक-एक रुपया जोडून जमवलेली रक्कम एका सुरक्षित आणि विश्वासार्ह हाती हवी, तेव्हाच एका सर्वसामान्य माणसाला शांत झोप लागते. पुणे नागरी सहकारी पतसंस्था तुमच्या या बचतीचे महत्त्व जाणते, म्हणूनच तुमची बचत आम्ही जबाबदारीने सांभाळतो आणि त्यावर जास्तीत जास्त परतावा देखील देतो. इतकंच नाही तर बचत खात्यासोबत NEFT, RTGS, एसएमएस बँकिंग या सुविधादेखील देतो, जेणेकरून गरजेच्या वेळी तुम्हाला तुमची रक्कम त्वरित मिळावी.
आता आपल्या बचतीला सुपूर्द करा एका विश्वासार्ह ठिकाणी, बचत खात्यासंदर्भात अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
