ग्रामीण / शहरी भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने २००१ साली तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या समृद्ध भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतचा बघता-बघता दहा हजाराहून अधिक सदस्यांचा महापरिवार झाला आहे. येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणे हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत पतसंस्थेची शाखा पुणे जिल्ह्यात आहेत.
Our mission
संस्थेचा 24 वर्षांचा हा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. संस्थेमध्ये ग्राहकांना दिला जाणारा आदर, आपुलकीची सेवा आणि खूप मोठी विश्वासार्हता या जोरावर संस्थेने नुकताच 10 कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. अतिशय छोट्या छोट्या व्यवसाय सुरु केलेल्या ग्राहकांना त्यावेळी पतपुरवठा करून ग्राहकांच्या व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाची भांडवल उपलब्धतेची भूमिका संस्थेने बजावली. आज त्या ग्राहकांच्या यशाचा आलेख आणि संस्थेप्रती त्या ग्राहकांची निष्ठा दोन्ही अचंबित करणारी आणि अतिशय समाधान देणारी आहे.
Our vision
विश्वासर्हता , प्रामाणिकपणा ,उत्तम ग्राहक सेवा आणि समाधानी ग्राहक हि संस्थेची मालमत्ता असून या सूत्रांच्या आधारे आणि संचालक मंडळाचा दुरदृष्टीकोन , उत्तम निर्णय क्षमता व मार्गदर्शन आणि कर्मचा-यांची व संचालक मंडळाची मेहेनत या बळावर संस्था यशाची शिखरे गाठत आहे. याचाच परिणाम म्हणजे संस्था विविध पुरस्कारांनी गौरविली गेली. सहकार क्षेत्रात संस्थेच्या कामाची दखल राज्यपातळीवर घेतली. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत व सत्कार संस्थेतर्फे एक छोटेसे रोप देऊन केला जातो व त्या रोपाप्रमाणेच संस्थेचे यश व कीर्ती बहरत जावो हि इच्छा..